डोहाळे -कविता
माझा पुतण्या कौस्तुभ याच्या बायकोचा म्हणजे श्रुतीचा डोहाळे सणाचा कार्यक्रम आम्ही नुकताच साजरा केला. लॉकडवून मुळे ,व ते दोघे अमेरिकेत असल्याने आम्ही ई -डोहाळे सण ऑनलाइन साजरा केला ,पंधरा-वीस कुटुंबांनी हा सण धुमधडाक्यात आपली उपस्थिती दाखवून कार्यक्रमाला रंगत आणून एक अभिनव प्रयोग मजेत यशस्वी केला .त्या निमित्याने मी चार ओळी सादर केल्या --------- सण श्रुतीचा -"डोहाळ्यांचा"
---ई-डोहाळे------
करू साजरा आज श्रुतीचा आनंदे अभिनव सण हा डोहाळे !
जमले बघण्या आज स्वकीय-आप्तगण हे सगळे !१! दूर देशी वसे दोघे ,म्हणुनी आंतर जाला द्वारा करू काही आगळे ! काव्य,नाच गायने प्रसंगी करती सर्व नित वेग-वेगळे !२! उत्साहाला उधाण येति पाहता अति रम्य हे साज सोहळे ! पणज्या -आज्या पुसती बघून हे पाणावलेले निज डोळे!३! मनोमनी कल्लोळ दाटे भावनांचे ,घेऊनि निरांजन कवतुकें ओवाळे ! सज्ज सारे घरी आपुल्या करुनि गोड शिरा वरी कांदा-भाजी तळे !४! कौस्तुभ रंगवी मनी संसाराचे सुख चित्र मात्र आज वेगळे! अधीर जाहला मनी बघण्या बाळाची सोनपाऊले हि कोवळे !५!
वाट पाहती आजी-आबा ,नाना-नानी करोनाचे संकट कधी टळे ! जाऊ मग सत्वरी आम्ही अमेरिकेला पुरवाया श्रुतीचे डोहाळे!६! लहान नणंदा-दीर उभी घेऊनि हाती खेळावया छानसे खुळखुळे !
सारखे पुसती सांगा कधी मिळे ग आम्हास बाळासंगे नव-नवी खेळे !७! म्हणती पणज्या बघितले असे आम्ही कितीतरी ऊन-पावसाळे ! हुरहूर तरी लागी जीवाला कसे बरे असेल कौस्तुभ-श्रुतीचे बाळे !८!
आज्याही गाती पाळणा सुंदर सुस्वरें ,सूर नाद लाजवी आज कोकिळे ! कल्पनेच्या विश्वी लागल्या सजवू सहज अनुपम ,शानदार झोपाळे !९! तुम्हा सगळ्यांचा बघता आग्रह केले हे काव्य कसे तरी बळे -बळे ! म्हणती मोहरा बस आता पुरे करा तुमचे नसते विदुषकी चाळे !१०! करू साजरा आज श्रुतीचा आनंदे अभिनव सण हा डोहाळे ------------------!
१३०६२०२० --मोहरा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा