“ओरीओ”
ओरीओ हा पण इंग्लिश कॉकर्स स्पॅनियल जातीचा ,मूळ जात स्पॅनिश, "कॉकर्स वूड"या पक्षाची शिकार झाल्यानंतर त्याला नेमक्या त्या जागेवरून हुडकून काढून मालकापर्यंत पोचवणे हे यांचे मुख्य काम. म्हणून या प्रजातीला" कोकर्स स्पॅनियल" म्हणून ओळखल्या जाते. अमेरिकन कॉकर्स स्पॅनियल व इंग्लिश कॉकर्स स्पॅनियल अश्या दोन यांच्या प्रजाती आहेत. अतिशय माणसाळलेली प्रजाती म्हणून जगभरात यांची गणना होते. कुटुंबाचा "मोस्ट फ्रेंडली" साथीदार म्हणून खूप लोकांनी या प्रजातीला आपल्या घरात स्थान दिले आहे ,दिसायला अतिशय लोभसवाणे ,पण काटक यामुळेच बऱ्याच घरात यांनी आपले स्थान पक्के केलेलं दिसते
ओरीओ म्हणजे फ्रेंच मध्ये "सोन" ,म्हणूनच जावयानी लग्नाच्या आधी मुलीला हा सोन्यासारखा ओरीओ "गिफ्ट"म्हणून दिला,त्यामुळे नवऱ्याबरोबर हाही तेवढाच लाडका. तस ओरीओ. म्हणटल कि आपल्या डोळ्यासमोर उभं राहत ते ओरीओ बिस्कीट ,चॉकलेटी काळ आवरण व आतमध्ये पांढरे मस्त मलईदार क्रीम त्यामुळे लहान मुलांचं अत्यंत प्रिय , हा ओरीओ सुद्धा असाच पूर्ण काळाकुट्ट पण क्रीम सारखाच गोड ,लोभसवाणा! अंगावर लांबसडक नाही पण चेहरा ,पायावर छान केशसंभार असलेला ,कान जमिनीपर्यंत पोहचतील असे लांब त्यामुळे सासरचं हे "झापर" कुत्र आपण पाहिल्याबरोबर प्रेमात पडाव असं. सासरच्या कुत्र्याला हाड-हाड न करता त्याला आदराने संबोधावे ,त्याला सुद्धा अहो,जाओ करावं असं आपल्याकडे गमतीने म्हंटल्या जाते, पण आजकाल जावयालाच नावाने अरे-कारे केल्या जाते तीथे त्यांच्या कडल्या कुत्र्यांचे काय?असो, पण आमच्या सगळ्यांचा तो ओरया, ओरू, ओरीओ ,बाबू ,तोतो अशी कितीतरी वेगवेगळी नाव.
ओरीओचे वय जेमतेम पाच वर्षे त्यामुळे नजर सतत भिरभर व मस्ती करायला तत्पर त्याच्यामुळे खेळण्यात छान मजा येते.समोरच आजी-आजोबा राहत असल्यामुळे याचा अर्धा मुक्काम त्यांच्याकडेच. आजी पण प्रेमाने त्याच्या खाण्याच्या वेळा ,औषध सगळं व्यवस्थित सांभाळत असते आजीची साडी हा त्याचा" वीक पॉईंट",कुठेही दिसली कि हा घेऊन येणार व तिच्यात तोंड खुपसून झोपणार ,अर्थात आजीची उबदार माया त्याला त्यातून मिळत असावी ओरिओच एक वैशिष्ट्य म्हणजे हा एकटा सुद्धा दिवसभर राहतो ,बाल्कनीत बसून घरचे कोणी दिसतात का बघत ,पण अतिशय शांतपणे गोंधळ न करता इतकं कि शी-सु वर सुद्धा पूर्ण कंट्रोल करून हे विशेष. आजी कडे असला आणि फोन ची रिंग वाजली कि लागलीच कान टवकारून आपल्याच आई-बाबांचा फोन असेल म्हणून पळत बाल्कनीत धावत जाणे व बघत राहायचे खाली कोणी दिसते का,आलं तर नाही ना .... ?
मुंबईकर असल्याने थोडी शिस्त पण अंगात भिनली आहेच ,गोळी केळातून न चुकता घेणारा ,वेळ झाली कि गोळीच्या बाटलीकडे बघत मला द्या, वेळ झाली सुचवणारा . केळ अत्यंत आवडते म्हणून समोर नाही पण माघारी मी त्याला केळकर म्हणतो (कोकणस्थ आडनाव असल्यामुळे थोडं भान ठेवावं लागते) याचेही कान दूध पिताना मात्र बांधावेत लागतात .ठराविक पण मोजकाच आहार पण आमच्या भाषेत "टूकाराम",खाताना सतत टुकणे ह्या स्वभावधर्माला चोखपणे जपणारा.
कार मध्ये बसणे हा ओरीओचा आवडता छंद !बाहेर जायचं असलं कि याला बरोबर कळते ,स्वतःच पटकन कारच्या दारासमोर आधीच जाऊन उभा राहणार आणि दार उघडले कि उडी मारून आत बसायचे चक्कर मारल्याखेरीज उतरायचंच नाही हे ठरलेलं .ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसून काचेच्या बाहेर तोंड काढून बाहेरची गंमत बघत बसणे खूप आवडते . घरचाच मेम्बर असल्यामुळे जिथे "पेट्स अलाऊड"असतात त्याच हॉटेलला वीक एन्ड ला हा जाणार व घरच्यांबरोबर मस्त वीक एन्ड साजरा करणार. चारचाकी शिवाय ऍक्टीव्हा च्या मधल्या जागेत बसायला सुद्धा याला खूप आवडते ,जवळपास जायचे असले कि मागच्या सीटवर स्वारी पाय घट्ट रोवून छान बसली असते.
ओरीओ हेच सध्या विश्व् असल्यामुळे त्याचे लाड सुद्धा खूप केल्या जातात .मुंबईच्या पावसात बाहेर फिरायला कस न्यायचे म्हणून याला रेनकोट आणला भर पावसात रेनकोट घालून पावसाची मजा घेत सोसायटीच्या आवारभर फिरणे हा याचा हक्कच! पहिल्या दिवाळसणाला यायचं मग ओरीओला का नाही न्यायचं ?म्हणून मुंबई-नागपूर कारचा प्रवास मजेत करून त्यानेही लेक-जावयाबरोबर आपला दिवाळसण उत्साहात साजरा केला अर्थात प्रवासात शहाण्यासारखा राहून.
एकदा मुलीकडे गेलो असताना आमची आई घेते अशीच "थॉयराइड"च्या गोळीची बाटली दिसली जरा काळजीयुक्त स्वरातच मुलीला त्याबद्दल विचारले, अरे,बाबा ती ओरीओची गोळी आहे सकाळी उठल्यावर त्याला द्यावी लागते !म्हणटल धन्य आहे ,कुत्र्यानापण थॉयराइड असतो हे ज्ञानामृत मला त्या दिवशी मिळाले .आता सगळा जमानाचं बदलला आहे,काही घरी माणसांना कुत्र्यासारखं तर काही घरी कुत्र्यांना माणसासारखं वागवलं जाते हे कटुसत्य मात्र कुठेतरी अधोरेखित करता आलं. हे सगळे कुत्रे तसे नशीबवान म्हणटले पाहिजे त्यांना "कुत्रा"म्हणून संबोधले तरी मालकांना खूप राग येतो .माणसांना माणूस न समजणारी हि पिढी (अर्थात सगळी तशी अजिबात नाही हे तेवढेच कौतुकास्पद व सत्य)कसा विचार करते हे पाहून आश्चर्य वाटते ,पण मुक्या प्राण्यावर दया करा हे मात्र शब्दशः जगतात हे बघून मन थोडं सुखावत सुद्धा.
आमच्या लहानपणी आमच्या घरचा आकू ,टिपू चिडेल म्हणून लांबूनच आंघोळ घालायचा कार्यक्रम व्हायचा ,कुत्र्यांचं साबण म्हणून एक विशिष्ट ब्रॅंडनेम असलेला साबणच हमखास लावले जायचे, पण आता ओरीओ सारख्यांची आंघोळ म्हणजे एक सोहळाच असतो त्याचा साबण ,शाम्पू, ब्रश,कंगवा ,मऊशार टॉवेल आदी सज्ज उपकरणांनी हा सोहळा पार पडल्या जातो एवढेच काय त्याचे दात घासायला विशिष्ट पेस्ट आणि ब्रश सुद्धा! ऐकावं ,बघावं ते नवलच .पण ओरीओला आंघोळ अजिबातच आवडत नाही प्रत्येक लहान मुलांशी बोलताना एक विशिष्ट शब्द असतात ,त्याला काही अर्थ नसतो पण ती भाषा त्याला आणि घरच्यांनाच कळत असते ,तसेच याच्या भाषेत आंघोळ म्हणजे "तो-तो " हा शब्द जरी ऊच्चारला. तरी हा पलंगाखाली दडून बसणार ,बाहेर पाय धरून ,ओढत त्याला बाथरूम मध्ये ढकलत न्यावे लागणार इतकी दहशत तो-तो शब्दाची आहे .
आपण क्षेम कुशलचा फोन केला कि त्याच्या कानाला फोन लावून बघ आई-बाबांचा फोन आला म्हणून आम्ही इकडून लाडा - लाडाने ओरीओ आवाज देणार ,त्याला कळते कि नाही देव जाणे पण तो ढिम्म ,स्थितप्रज्ञासारखा उभा राहणार ,मग व्हिडीओ कॉल ने त्याचा चेहरा बघून आपण कौतुक करून फोनचे सोपस्कार पार पाडायचे .लांब राहून जवळ असण्याचं समाधान बाळगायचे !
एकदा तर ओरीओनी गम्मतच केली बेसनाचे भरपूर लाडू करून आजीने परातीत थंड करायला ठेवले हा कधी त्यांचा डोळा चुकवून स्वयंपाक घरात शिरला कळलेच नाही आणि भराभर त्याने सगळे लाडू क्षणार्धांत फस्त केले ,हा काय जिभल्या चाटत आला म्हणून आजीने बघितले तर परातीत एकही लाडू नाही ,मुका प्राणी फटके पण मारू शकत नाही ,पण पुढचे दोन दिवस त्याने आयुष्यातली पहिली "डिसेंट्री "मात्र अनुभवली ,अर्थात तेव्हा तो लहान होता मग समज आल्यावर आजीच्या "बाबूने" असा बावळटपणा कधी केला नाही.
तशी कॉकर्स स्पॅनियल जात हुशारच त्यामुळे ओरीओला घरीच बऱ्यापैकी ट्रेन केल्या गेलं आहे ,नाही म्हणटल तर खाण्याच्या वाटीला तोंडसुद्धा लावत नाही,बघत बसतो बिचारा पुढील आदेशाची वाट बघत. "हाय-फाय"( म्हणजे आपले आलू, टिपू,पंजा द्यायचे ते ),दोन पाय वर घेऊन बसणे ,शी-सु घराबाहेरच करायला जाणे ,उडी मारून बिस्कीट गपकन गिळणे आदी प्रकार छान जमतात
थोडा लहान असताना त्याला नागपूरला आणले होते,नॉडी आणि ओरीओची तेव्हा छान गट्टी जमली होती दोघांच्या वयात अंतर खूप एक बालवाडीतला तर दुसरा थेट हायस्कुलमधला ,पण कुठे भांडण नाही ,तंटा नाही किंबहुना लहान्यांच्या मस्तीला जाने दो बच्चा है ...... म्हणून दुर्लक्ष करणारा ,वडीलकीच भान सहजपणे जोपासणारा आणि हा छोटा दादा दादा करीत सतत त्याच्या मागे-पुढे दिवसभर करणारा !दादाच जेवण -पाणी पटकन येऊन संपवणारा बालसुलभ खोडकर ,दादा तितकाच स्थितप्रज्ञ ,शहाण्यासारखा ,छोट्याच कौतुक बघणारा ,त्यामुळे जो पर्यंत तो होता तो पर्यंत दोघांनीही एकमेकांना समजून घेतले ,वेगळा विदर्भ,आमची मुंबई न करता "संयुक्त महाराष्ट्र "च्या भूमिकेत कायम दिसले.
आता ओरीओच बालपण संपून तारुण्यात तो पदार्पण करतो आहे त्यामुळे ती मस्ती, सैरावैरा पाळणे,पटकन येऊन काहीही खाणे याच्यावर नक्कीच मर्यादा आल्या आहेत पण ओरीओ म्हंटल की त्याच बालपण डोळ्यासमोर उभं राहत व कळत नकळत आपणही त्या सुरम्य आठवणीत गुंतून पडतो एवढं मात्र खरं !
09062020 मोहरा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा