पचमढी-एक प्रवास वर्णन
" पचमढी"---सातपुडयाची "राणी"
संपूर्ण भारतवर्षात हिल स्टेशनची काहीच कमी नाही.उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम सगळ्या भागात अनेक हिल स्टेशन सुप्रसिद्ध आहेत. पण मध्य भारतात ,त्यातही मध्यप्रदेशात असलेलं एकमेव हिल स्टेशन म्हणजे पचमढी .सातपुडा पर्वताच्या क्षेत्रातील ,निसर्गरम्य ,अतिशय मनोहारी ,विविध रंगाच्या ,ढंगाच्या, फुलं-वृक्षांनी बहरलेलं व वर्षभर हिरवेगार असणार नितांत सुंदर, स्वर्गीय पचमढी !आणि म्हणून तर याला "सातपुड्याची राणी" होण्याचा गौरव प्राप्त झाला तो उगीचच नाही.
नागपूरपासून फक्त २२५ किलोमीटर दूर असलेलं पचमढी व तितकेच दूर असलेलं चिखलदरा कधी शाळेच्या "ट्रिप"बरोबर गेलेली हि ठिकाण इतक्या जवळ असूनही आपण का बर गेलो नाही ?हा विचार करता खरच आश्चर्य वाटते. बराचसा भारत ,किंबहुना परदेश दौरा सहज करून आलेलो आपण इतक्या दिवसात हि निसर्गाशी एकरूप झालेल्या ठिकाणांना आपण भेट दिली नाही म्हणून मन थोडं खट्टू पण होत होते , तरी "घर कि मुर्गी दाल बराबर"
असच काहीतरी मनात ठेऊन समाधान करत "देर आये दुरुस्त आये "या भावनेने सलग एक वर्षाच्या अंतराने ह्या दोन्ही पर्यटन स्थळांना आम्ही आवर्जून भेट दिली .स्वतःचा,बायकोचा वाढदिवस ,लग्नाचा वाढदिवस या विशेष दिवशी बाहेर कुठेतरी आम्ही जातोच (घरी राहून नको त्या आठवणी काढत वादावादी टाळणे हा त्या मागचा उदात्त विचार असू शकतो!),अगदी कार्यव्यस्ततेमुळे नाहीच कुठे जमले तर नजीकच्या रिसॉर्टला ,पण जाण मात्र नक्की. या वेळला लग्नाचा वाढदिवस पचमढीला साजरा करायचाच हि खूणगाठ मनाशी बांधून तयारीला लागलो .
फिरायला जाताना पैश्याची उधळपट्टी नाही पण अगदीच काटकसर करून जायचं म्हणजे प्रवासाची मजा कमी करून घेणे ह्या विचारांवर मी ठाम असल्याने पचमढीला भाडेतत्वावर कार घेऊन जायचे ठरले व मध्यप्रदेश पर्यटन विभागाचा बंगला आधीच आरक्षित करून ठेवलेला होताच,त्यामुळे एक निश्चितता होतीच ,
ठरल्याप्रमाणे सकाळी सातच्या ठोक्यालाच गाडीवाला हजर झाला,रामदास त्याच नाव ,मराठी माणूस ! बहुतेक ड्रायव्हर असतात तसाच. अतिशय "चोम्बडा",तितकाच बडबड्या पण त्यामुळे प्रवास व स्थळ दर्शन तसंच चांगलं खाण ,ह्या सगळ्या गोष्टींची खडानखडा माहिती असलेला मोफत गाईड मात्र आपल्याला सहजासहजी मिळतो ,त्यामुळे मला प्रवासात तरी असलेच ड्रायव्हर "प्रिय"असतात. नशिबाने सुरवात तर चांगली झाली म्हणून मी खुश होतो. जेमतेम कोरडी आल्याबरोबर गाडी रस्ता सोडून आपलं खाद्य अर्थात पेट्रोल भरायला व हवा चेक चेक करायला थांबली. (हि सगळ्या ट्रॅव्हल कंपनीची नेहमीची खोड ,कुठे गिऱ्हाईकाला एकदम पॆसे देणे जीवावर आलं तर ?म्हणून हे टप्प्याटप्प्याने वसुली करणार ) सगळी चाक टक टक करून बघितल्यावर चला साहेब म्हणताच टगळ-मंगळ करीत अख्ख्या पेट्रोल पंपाची पाहणी करणारी आमची स्वारी गाडीत बसली ,आता कुठे थांबायचं नाही अशी आस्वाशक सूचना देत स्वतःची व आमची व्यवस्थित ओळख करून घेण्याचं त्याच काम मात्र चालूच होत.
नागपूर-छिंदवाडा चार पदरी महामार्गावरून (गडकरींची कमाल ह्या रस्त्यावरून जाताना सहज लक्षात येते )गाडी सुसाट वेगाने जात होती महाराष्ट्र सीमेवरील शेवटल मोठं गाव केळवद सोडून आता आम्ही मध्यप्रदेशात पोहचलो होतो,इतक्यात आलेली बातमी म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील "पहाटेचा शपथविधी" मोबाईलमधून डोकं वर काढू देत नव्हता व एक चांगली बातमी मिळाली म्हणून थोडं सुखावल्यासारखं वाटत होत. आता, रस्त्यावरील एक दोन वसुली पथक अर्थात टोल-नाके पार करत आम्ही सौंसरच्या आधी असलेल्या जामसावली येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात दर्शनाला गेलो.अतिशय जागृत व प्रसिद्ध असलेल्या ह्या मंदिरात हनुमंताची मूर्ती भद्रा अवस्थेत असून अतिशय सुंदर व भव्य मंदिर आहे.
जामसावली वरून लागलीच आपण सौंसर ह्या तालुक्याच्या ठिकाणी पोहचतो, गावाच्या आधीच आमचं पितृक गाव "मोहगांव” ची पाटी बघून आजही आम्ही मालगुजार आहोत या स्वप्नात असतानाच सौंसर बस स्थानकाच्या चक्क आत गाडी थांबल्यावरच स्वप्नातून जागे झालो. नागपूर किंवा छिंदवाडा वरून येणारे बहुतेक प्रवासी या बसस्टँडवर थांबून चहा व तर्री-पोह्यांचा आस्वाद घेतल्याशिवाय पुढे सरकत नाहीच.पोहे त्यावर झणझणीत तर्री ,बारीक चिरलेला कांदा ,शेव,कोथींबीर हि नागपुरी लोकांची आवडीची व हक्काची डिश,सोबत गरम-गरम कांदा-मिरची भजे यांचा मनमुराद आस्वाद घेऊन पूर्ण क्षुधा-शांती करून मस्त वाफाळलेला आल्याचा चहा घेऊन पुढे मार्गस्थ झालो.
पूर्वी मध्यप्रदेशातले रस्ते हा एक विनोदाचा विषय होता पण आता महाराष्ट्राला लाजवेल इतके सुंदर रस्ते आम्हाला थेट पचमढी पर्यन्त मिळाले ,रस्त्यानी जाताना पेंच कॉरिडॉरचा एक भाग असल्यामुळे जंगल बऱ्यापैकी दिसत होते छिंदवाड्याचा घाट पार करत असताना साग ,साल बांबू ची उंच उंच झाडे ,खोल दऱ्या ,काही ठिकाणी मुद्दाम बनवल्या गेलेले "व्हिव्यू "पॉईंट बघत वन विभाग ,बांधकाम विभागाच्या सूचना जंगल व प्राणी संवर्धनाचे दगडांवर काढलेली चित्रे बघत वेड्या-वाकड्या वळणांवरून आमचा मार्गप्रवास सुरु होता इथे बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात वानरसेना रस्त्यांच्या कडेला दिसत होती . अनुभवाने रामदासाने सौंसर वरून फुटाण्याचे पाकीट आवर्जून घेतले होते ,ते व केळी ह्या रामदासाने ,रामाच्या दासांना गाडी थांबवून यथेच्छ खाऊ घातली ,वन विभागाच्या सुचनांचा आदर करायचा हे त्याच्या लेखी नव्हतेच ,माझं शहरी मन उगाचच शहाणपण सांगण्याचा प्रयत्न करत होत पण त्याच "प्राणीप्रेम"याला भीक घालत नव्हते पण त्यांची खाण्याची तगमग ,छोटी छोटी पिल्यांची मस्ती बघून मन मात्र नक्कीच हरखून गेले.
छिंदवाड्याच्या बाहेरूनच परासिया बायपासने आम्ही परासिया शहराच्या आधीच पचमढी कडे जाणाऱ्या रस्त्याला लागलो. थोडं अंतर पार केल्यावर तामिया गाव लागते. निसर्ग किती सुंदर असावा ,हे बघायचं असेल तर तामियाला नक्की जावंच. इथे असलेल्या पीडब्ल्यूडीच्या विश्राम गृहातून ,सातपुडा, पचमढीच विलोभनीय दर्शन घडते. इथला सनसेट बघायला नेहमीच गर्दी असते. तस तामिया हे एक पचमढीसारखंच निसर्गरम्य स्थळ ,त्यामुळे मध्यप्रदेश टुरिझम ,खासगी हॉटेल -मोटेलची ,धाब्याची खूप रेलचेल आहे.गुप्त महादेव ,निसर्गनिर्मित धबधबे,दाट झाडांनी आच्छादिलेले पर्वत दऱ्या ,पाताळकोट (आदिवासी जमिनीच्या खाली म्हणजे पाताळात राहतात,सर्व भौतिक परिघाच्या बाहेरील त्यांचे जीवन इथे दिसते.रामायणातील मेघनाद जेव्हा पाताळात होता ते ठिकाण हेच अशी आख्यायिका आहे.)हि सर्व प्रेक्षणीय स्थळे बघण्याकरिता मुद्दाम वेगळा वेळ काढावा लागेल पण पचमढीच्या तुलनेत इथला निसर्ग जास्तच भावून गेला ,ते परत यायच्या निश्चयानेच!
तामिया पार कडून, आम्ही लवकरच पचमढीला पोहचतो आहे हे दिशादर्शक फलकांवरून सहज लक्षात येत होत. पचमढीचा घाट पण खूप छान आहे ,दोन्ही बाजूला जंगल .व,सापाच्या चालीसारखे वर खाली जाणारे रस्ते बघून मन प्रफुल्लित होत होते .पचमढीच्या आधी रस्त्याच्कया कडेने ३००-४०० जवानांचा ताफा रूट मार्च करीत जाताना दिसला ,एका लयीत ,शिस्तबध्द चालणारे सगळेच पोरसवदा जवान होते,नवीन "रंगरूट" असावेत ,प्रशिक्षणाच्या कुठल्यातरी भागाचा त्यांचा हा रूटमार्च खूपच विलोभनीय दिसत असताना ,मनात देशप्रेमाची भावना अनावर होत ,कळत नकळत हात त्यांना "स्यॅल्युट "मारून गेला .थोड्या अंतरावर एका विशिष्ट्य पद्धतीने बांधलेले त्यांचे तंबू तितकेच शिस्तबद्ध व एक अंतर ठेवून एकाच लाईनीत बघताना मिलट्रीच्या शिस्तीला एक कडक सलाम मात्र केल्या गेला.
आमचं निवासस्थान आधीच आरक्षित केल्यामुळे थेट तिथेच पोहचलो.आफिसमध्ये कागदपत्रांची सगळी पूर्तता केल्यावर आम्हाला खोलीचा ताबा दिला, सामान खोलीत ठेवणाऱ्याच्या हातात बळे बळेच शंभर रुपयाची नोट ठेवल्यावर स्वारी भलतीच खुश झाली व भर बारा वाजता न मिळणारा चहा तोही एकदम फक्कड त्याने लागलीच पोचवून दिला. मुळात, कुठेही प्रवास करताना, ड्रायव्हर,रुमसर्व्हंट ,वेटर यांच्याशी हात सढळ सोडल्यावर जी विशेष "सेवा"आपल्याला पटकन मिळते त्याला तोड नसते ,काउंटरवर विराजमान असलेल्या मॅनेजरला दहा वेळा सांगून जी काम होत नाही ती हे लोक क्षणाचा विलंब न करता सहज करतात म्हणून "आधी दाम मग काम "हे शास्त्र अनुभवांनी मला चांगलेच अवगत झाले आहे अगदी परदेशवारीत सुध्दा!
पचमढी हिल स्टेशन मध्य प्रदेशातील होशंगाबाद जिल्ह्यात सुमारे ३५०० फूट उंचीवर आहे,नेहमीसारखाच ब्रिटिशांनी हे ठिकाण शोधलं,तिथे आपलं बस्तान बसवलं त्यामुळे इथे ब्रिटिशकालीन बंगले खूप आहेत .स्वातंत्र् मिळाल्यावर सर्व राज्य सरकारांनी ते ताब्यात घेऊन त्याचे टुरिस्ट बंगले,शासकीय निवासस्थान ,ऑफिसेस चांगल्या पद्धतीने करून घेतले. मध्यप्रदेश पर्यटन विकास निगमच्या आमचा ":देवदारु "बंगला पण याच पठडीतला!मोठ्या उंच खोल्या, व्हरांडा,समोर सुंदर बगीचा ,झोपाळे ,बाजूलाच रेस्टारेंट अश्या सगळ्या सुखसोयीने ,सुसज्य व जुन्या काळातील वास्तूचा पुरेपूर आनंद देणार हे निवास्थान बघितल्याबरोबर त्याच्या प्रेमात पडावं असं!आजूबाजूच्या एक-दीड किलोमीटर परिसरात अमलताश,चंपक,ग्लेन व्हीव्यू ,हिलटॉप,कर्णिकार,सातपुडा, क्लब हाऊस अशी कितीतरी बंगले असेच निसर्गाच्या सानिध्यात नटलेले बघूनच छान वाटावं,थोडे पैसे जरी जास्त मोजले तरी किमतीच्या अनेकपट मनःशांती देणारे हे बंगले पचमढीचे सौन्दर्य अजूनच खुलवतात.
पचमढी हे जुन्याकाळी गोंड राजाची अधिसत्ता असलेलं व आपल्या लष्करी हालचालींना उत्तरेत जाताना सोयीचं पडावं म्हणून ब्रिटिशांनी विकसित केलेलं ठिकाण.! आजही" पचमढी कँन्टाॅन्मेंट "इथला कारभार बघते .भारतीय सेनेचे मध्यभारतातील एक मोठे केंद्र व संपूर्ण भारतातील सैन्य दलाचे "आर्मी एजुकेशनल कोअर"चे मुख्यालय इथे आहे.अनेक "सॅनोटोरियम" ब्रिटिशकाळापासून इथे दिसतात,बोटिंग,पॅराग्लायडींग,ऍडव्हेंचर कॅम्प ,ट्रेकिंग साठी योग्य असलेले हे ठिकाण ,वनऔषधीच्या बाबतीत अतिशय संप्पन आहे. निसर्गरम्य पर्यटन स्थळ ,तसेच धार्मिक पर्यटनाकरता प्रसिद्ध हे ठिकाण वरील बाबींकरीता सुद्धा पर्यटकांचे आवडते स्थान ठरत आहे. मुबलक निवास व्यवस्था ,उत्तम व सगळ्याप्रकारचे खाणे त्यामुळे पर्यटकांचा ओढा इकडे सहज वळताना दिसतो.
पचमढीच पर्यटन हे मुख्यत्वे दोन प्रकारात विभागता येईल ,एक धार्मिक पर्यटन ,तर दुसरे निसर्ग पर्यटन. त्यातही आपली गाडी घेऊन जाता येणारी स्थळ व काही पर्यटन -फॉरेस्ट विभागाची परवानगी, तिकीट ,घेऊन जाणारी स्थळ ,यात जिप्सी,गाईड ,प्रवेश शुल्क इ. सगळं समाविष्ट असत. मुळात हि माहिती असली कि कुठे आणि कस जायचं हे आपण व्यवस्थित "प्लॅन"करू शकतो. एकूण दोन रात्रीच्या थांबण्यात बहुतांश पचमढी दर्शन आपण पूर्ण करू शकतो.
नोव्हेंबरचा शेवटला आठवडा असल्याने चांगलीच कडाक्याची थंडी पण अतिशय आल्हाददायक थंडी होती ,सगळा लवाजमा म्हणजे स्वेटर,कानटोपी ,जर्किन ,शॉल बरोबर असल्याने चांगली सोय झाली होती ,या सोयीवरून आठवलं ,एक मजेदार किस्सा घडला. रात्री जेवायच्या आधी रामदासला म्हंटलं अरे, थंडी खूप आहे जवळपास काही "सोय"आहे का?लिकर कुठे मिळेल ,त्याला समजावं म्हणून सोप्या भाषेत विचारले, हे महाराज मार्केटमध्ये खूप दुकान आहेत,मी दाखवतो न, असे नेहमीप्रमाणे म्हणाले, म्हणून मी आनंदाने गाडीत बसलो,भर बाजारात गल्ली-बोळातून ,चढ उतारावरून एका ठिकाणी गाडी उभी करत त्याने समोरचे दुकान दाखवले,दुकानावर ,बाहेर सगळ्या व्हीआयपी ,जॉकी ,माचो इ जाहिरातींचे फलक दिसत होते म्हणटल ,असते एकेका गावाची पद्धत,कुठे तरी कोपच्यात आतमध्ये असेल दुकान,मोठ्या उत्साहाने आत शिरलो व दोनच मिनटात बाहेर पडलो,तोंड वेडेवाकडे करत ,याला खाऊ कि गिळू या अविर्भावात बघत असताना हे स्टेअरिंगवरच डोकं शांतपणे वर उचलत निर्विकारपणे विचारते झाले,भेटलं का साहेब?लवकरच आले !मी म्हंटल अरे मुर्खा,तू मला कुठे पाठवले?तेवढ्याच शांतपणे तो म्हणाला साहेब तुम्हाला "निकर "हवी होती ना?मी कपाळावर हात मारून घेतला,हा घोळ शब्द खाली पडू न द्यायच्या तत्पर सेवेने केला."लिकर" आणि " निकर" या साधर्म्यामुळे आमचा चांगलाच "पोपट"मात्र झाला अर्थात नंतर ,पचमढीतील एकमेव असणाऱ्या दुकानात नेऊन त्याने आमची "सोय"छान केली तो भाग अलहिदा !
पचमढी हे नाव पाच मरही म्हणजे पाच गुंफा वरून पडले त्या "पांडव गुंफा" येथून आपण सुरवात करू या, वनवासात असताना पांडव इथे वास्तव्याला होते अशी वंदता आहे म्हणून याचे नाव "पांडव गुंफा" पण पुरातत्व विभागाच्या मते हे बौद्ध भिक्कूंचे राहण्याचे ठिकाण होते. पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या ह्या गुंफा नेहमीप्रमाणेच अर्ध्याच बघायला मिळतात ,बाकी बंदच आहे. पायथ्याशी अतिशय रमणीय ,"मेंटेन"केलेला मोठ्ठा बगीचा आहे पचमढीचा निसर्ग इथे ओथंबून वाहत असल्यासारखा दिसतो,बाहेर मैदानात मोठ्या चाकाच्या बाईक्स,सवारीसाठी उंट,घोडे बॅटरीवर चालणाऱ्या बाइक्स भाड्याने मिळतात ,आम्ही सुद्धा स्वयंचलित बाइकवर सवारी घेण्याची मजा मोकळ्या मैदानात मनसोक्त घेतली.
"जटाशंकर" हे स्थान हि गुहेत आहे. बरेच चढून इथे पोहचावे लागते. भगवान शंकर भस्मासुराकडून बचाव करण्यासाठी कैलास पर्वतावरून इथे राह्यला आले अशी आख्ख्यायिका आहे. मूळ स्वरूपातले शिवलिंग इथे आढळते, मंदिराच्या आत पाण्याचे कुंड असून कुठल्यातरी नदीचा प्रवाह किंवा उगम असल्यासारखा वाटतो,पहाडाच्या आत असलेल्या इथल्या खडकातून सतत पाणी झिरपत असते. खडकांच्या आत असलेल्या गुंफेत मंदिर आहे,शेषनागाच्या फण्यासारखे किंवा शंकराच्या जटेसदृश्य दिसणाऱ्या खडकांच्या आत मंदिर असल्यामुळेच याला "जटाशंकर"हे नाव पडलं असावं ,याचा उल्लेख थेट शिवपुराण तसेच नर्मदा पुराणात आढळून येत असल्याने याचे विशेष महत्व आहे. इथल्या खडकांवर अजूनही समुद्रातील रेती ,शंख -शिंपल्यांचे अवशेष दिसतात ,अति प्राचीन काळी हा समुद्राचा भाग असावा असे अभ्यासकांचे मत आहे. रस्त्यात सगळ्या आजारावरची कधीही न बघितलेली वन औषधींची ,मधाची, विपुल दुकाने दिसतात, थोडीफार खरेदी उत्सुकतेपोटी केल्या जातेच. खोडासारखा मोठा कंद "रामकंद"म्हणून विकायला एक जण बसला होता,त्याचे मोठे मोठे पांढरे शुभ्र काप दिसायला व खायला खोबऱ्याशी मिळते जुळते दिसले इथे जाण -येणं म्हणजे एक छोटं "ट्रेकिंग"केल्याची अनुभूती नक्की मिळाली.
"बडा महादेव" हे ७-८ किलोमीटर लांब असलेले शिवाचे मंदिर आहे, लांब गुंफेत वसलेले जुने मंदिर खडकाच्या आत वसले आहे गुंफेत असणारा अंधार ,खडकातून पडणारे पाणी एक वेगळा अनुभव देउन जातो, आतमध्ये वाकून जावं लागते ,आतमध्ये पाण्याचे छान कुंड आहे. आतमध्ये अतिशय थंड वाटणारे हे ठिकाण पुरातन स्वयंभू शिवलिंगामुळे दर्शनीय तर आहेच शिवाय श्रद्धेने येणारे भाविक त्यामुळे सतत गर्दी करून असतात. ह्या मंदिराच्या बाजूलाच अजून एक गुंफा आहे,इथे सुद्धा शिवलिंग असून खडकातून सतत पाणी वाहत असते. नवस पूर्ण करायला इथे दगडांवर दगड रचून पूजा केली जाते,गुंफेत असे लगोरी सारखे रचून ठेवलेले दगड मोठ्या प्रमाणात आढळतात.
"गुप्त महादेव"हे बडा महादेवपासून जवळ आणखी एक महादेवाचे पुरातन मंदिर आहे.बाहेरच हनुमंताची भव्य मूर्ती विराजमान असून खडकांच्या मध्ये असलेल्या एकदम चिंचोळ्या जागेतून गुंफेत जावं लागते ,जागा इतकी चिंचोळी आहे कि या जागेतून सरळ न जाता आडवे होत जावे लागते. गुंफा पण खूप लांब आहे,इथेही सगळीकडे खडकातून पाणी झिरपत असते. ह्या गुंफेतून थेट जटाशंकर गुंफेपर्यंत महादेव बारा किलोमीटर अंतर नागरूपात गेल्याची आख्यायिका ऐकायला मिळते
"चौरागढ "हे महादेवाचे सुप्रसिद्ध मंदिर पंचमढीपासून ६-७किलोमीटर दूर वसलेले आहे,अतिशय उंचीवर असलेले हे मंदिर पचमढीच्या बराचश्या स्थळावरून लांबवर दिसत असते. भाविकांची आत्यंतिक गर्दी असणार व जागृत असणाऱ्या या मंदिरात महाशिवरात्री,नागपंचमीला यात्रा असते .चढण्यास अत्यंत कठीण व जवळपास १३५०पायऱ्या असलेला मार्ग सलग नाही मधेच खडकाळ रस्ते, मातीचे ओबडधोबड रस्ते ,कधी सरळ मार्ग खाली उतरत कधी वर चढत आपण मंदिरात पोहचतो,रस्त्यात भाविकांसाठी पाणी नाश्ता,जेवण त्यातही मक्याची चुलीवरची भाकरी बरोबर टमाटोची चटणी सहज मिळते.मंदिर बरचस आधनिक पद्धतीने बांधलेले दिसते ,इथे शंकराला त्रिशूल अर्पण करायची पद्धत असल्यामुळे ,त्रिशूल जागोजागी खोचलेले दिसतात व एक वेगळेच दृष्य बघायला मिळते. विशेषतः नागपूर व मध्यप्रदेशातून भाविक "महादेवाला"चौरागढ व नागद्वारला नागपंचमी आणि महाशिवरात्रीला यात्रेला येत असतात या ठिकाणी आल्यावर "पोहा चाल्ला महादेवा"अशी स्वाभाविक आठवण झाली.
" नागद्वार"हे पचमढीपासून १५-२० किलोमीटर दूर असणार अति दुर्गम ठिकाण. नागपंचमीच्या निमित्त्याने लाखो लोक इथली पायी यात्रा करत दर्शनाला येतात पर्वताच्या कुशीत असलेलं हे मंदिर यात्रा स्थळ म्हणून खूपच प्रसिद्ध आहे. अतिशय कठीण व खडतर प्रवास असलेल्या या यात्रेला पूर्ण करायला दोन दिवस सहज लागतात. सातपुडा रिजर्व फाॅरेस्ट असल्याने फक्त नागपंचमीला इथे परवानगी असते,पर्वतांच्या आत बऱ्याच गुंफा असून तिथे दर्शनाला जावे लागते ,२-३लाख लोक यात्रेनिमित्त इथे येतात सापांचे अधिराज्य असलेला हा परिसर भाविकांसाठी सोपान असला तरी साहसी यात्रा स्थळ असेच याचे वर्णन करावे लागेल.
"कॅथलिक चर्च "व ख्राईस्ट चर्च पण पचमढीचे प्रसिद्ध आहे. हि दोन्ही चर्चेस स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असलेली असून याचे बांधकाम ब्रिटिश कालखंडातील आहे.चर्च मधील उत्तुंग काचा ,झुंबर, पितळी घंटा हे सगळं पुरातन ब्रिटिश काळाच्या वैभवाची साक्ष देत आजही जतन करून ठेवल्या आहेत. कॅथलिक चर्चच्या बाजूला दफन भूमी असून पहिल्या व दुसऱ्या जागतिक महायुद्धात प्राण गमावलेल्या सैनिकांची स्मृती इथे बघायला मिळते .आजही हे वेगळ्या शैलीचे चर्च पचमढीच्या सौन्दर्यात महत्वाची भर घालताना दिसतात.
पचमढीतील निसर्गसौन्दर्य स्थळांचा विचार करता संपूर्ण पचमढीवरच निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केल्यामुळे पावसाळ्यात जिथे बघावे तिथे सृष्टी सौन्दर्य अशी गत असते. असो,तरी आपण पर्यटक व आम्ही जिथे भेट दिली त्याचाच विचार करू.
"बायसन लॉज "हि ब्रिटिशांनी बांधलेली सगळ्यात पुरातन वस्तू समजल्या जाते,सध्या इथे टुरिजम विभागाचे ऑफिस ,फाॅरेस्ट व जिप्सीचा पास मिळायचं ठिकाण आहे. तसेच पचमढीचा नैसर्गिक वारसा सांगणार सुंदर संग्रहालय आहे बायसन, अर्थात रान गव्याला समर्पित हे बायसन लॉज पचमढीचा जागता इतिहास आपल्याला सांगते .सुंदर समर्पक आकर्षक प्रवेशद्वार ,वाघाने केलेल्या शिकारीची जिवंत वाटणारी दृशे मन मोहून घेतात.
या नंतर पर्यटकांचे विशेष आकर्षण असणारे ठिकाण अर्थात निसर्गरम्य धबधबे ,उंचावरून खाली कोसळणारे जलप्रपात याना भेट देऊ या.
" बी फ़ॉल "यालाच जमूना फॉल पण म्हणतात ,सगळ्यात सुप्रसिद्ध असलेला हा धबधबा पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे ,अतिशय खाली पायऱ्यांवरून उतरत गेलं कि याचा आनंद घेता येतो, अर्ध्या रस्त्यात एक दोन छोटे फॉल आहेत पण ते म्हणजे दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखे आहे,अर्थात खाली जायचे नसल्यास! अगदी वरून पडणाऱ्या पाण्याचा आवाज हा मधमाशीच्या गुणगुणण्यासारखा निरव शांततेत वाटावा असा किंवा मधमाशांच्या पोळ्यांची मुबलकता असावी म्हणूनही "बी फ़ॉल"नाव पडलं असावं. खूपच सुंदर आकर्षक खडकांवरून झरझरणारे पाणी बघून थकवा पार निघून जातो .इथल्या थंडगार पाण्यात यथेच्छ डुंबण्याचा आनंद सहज मिळतो.संपूर्ण पंचमढीला पाण्याचा पुरवठा इथूनच होतो.
"अप्सरा फॉल" किंवा अप्सरा विहार याच वैशिष्ट्य असं कि पडणार पाणी हे जास्त खोल नसलेल्या भागात पडत असल्याने नैसर्गिक तलाव झालेला दिसतो .लहान मूल ,व कुटुंबाबरोबर ह्या धबधब्याचा आनंद उत्तमरीत्या एकत्रित घेता येत असल्याने एक छान "पिकनिक स्पॉट "म्हणून या स्थळावर नेहमीच गर्दी असते . मुख्यतः शहराच्या जवळ असल्याने यायला-जायला अतिशय सोयीचा आहे.
"डचेस फॉल " किंवा जलावतरण फॉल या नावाने ओळखल्या जाणारा हा फॉल, इथे खूप वरून खडकावरून पडणाऱ्या पाण्याचे दृश्य मनोहारी दिसते ,इथल्या तलावात पाणी जमा होत असल्याने आरामात पाण्यात बसून आनंद घेता येतो,आलेला थकवा या शीतलतेमुळे सहज जातो,कारण पायी चालल्यामुळे आपण थकलेले असतोच.
"रजत प्रपात" किंवा सिल्व्हर फॉल हे नावच मुळी उंचावरून पांढऱ्या शुभ्र ,धवल रंगात पडणारे पाणी चांदीसारखे चकाकत पडते ,ज्यांना साहसी पर्यटन करायचे आहे त्याचा करिता इथे जाणे उत्तम समजल्या जाते . अप्सरा विहार पासून हे ठिकाण जवळच आहे.
या शिवाय "त्रिधारा"ज्याला पिकॅडली सर्कस पण म्हणतात ,इथे दोन प्रवाह एकत्र येऊन खाली पडतात हा पण एक उत्तम पिकनिक स्पॉट आहे.
"इरिन पूल",वनश्री विहार किंवा पॅन्सी पूल ,फुलर्स खुद किंवा वॉटर मीट ,सुंदर कुंड आदी तलाव ,व इतर पर्यटन योग्य ठिकाणे अशी बरीच आहेत. " देनवाच्या "प्रवाहाने तयार झालेली हि स्थळे खूपच सुखासीन अनुभव देऊन जातात.
धबधबे, तलाव या व्यतिरिक्त सुद्धा प्रेक्षणीय स्थळे पचमढीत आहेत ,ज्यावर निसर्गानी भरभरून आपले औंदार्य दाखवत निर्मिती केली त्यापैकी "प्रियदर्शनी पॉईंट "किंवा फोर्सिथ पॉईंट (ज्याने पचमढीचा शोध घेतला आणि ब्रिटिश साम्राज्य उभे केले )या ठिकाणाहून सातपुड्याच्या दऱ्या -खोऱ्याचे विहंगम दृश्य बघायला मिळते. "राजेंद्रगिरी"हे भारताचे पहिल्या राष्ट्रपतींच्या नावाने विकसित केलेले नयनरम्य उद्यान त्यांच्या नेहमी भेट देण्याचे कारण ठरलेले, अतिशय सुंदर आहे. "हंडी खोह" ह्या ठिकाणी अतिशय खोल दरीचे नयनरम्य दर्शन घडते . इथून चौरागढचे मंदिर दिसते ,खोल दरीत अक्राळ -विक्राळ पसरलेली झाड बघून उरात धडकी मात्र भरते ,ह्या दरीत आधी एक नदीचा प्रवाह होता असे म्हणतात.
" रिचगढ"हे खडकाळ भागात खाली उतरून जावं लागणारे ठिकाण, इथे गुंफा बऱ्याच आत गेल्यावर दुसऱ्या बाजूने उघडी झालेली दिसते. चिंचोळ्या गुंफेतून जात दुसऱ्या बाजूला निघणे हे एक प्रकारच ट्रेकिंग केल्याचे समाधान देणारे स्थळ. " सातपुडा नॅशनल पार्क "हा पचमढीचा एक भाग ,साग साल बांबू आदी वृक्षांची दाटी असलेल्या रम्य जंगलात रानगवा ,अस्वल ,बिबटे हरीण तसेच, अनेक जातीचे पक्षी सहज दिसून येतात थोडा वेळ काढून आपण या सफारीचा आनंद घेऊ शकतो.
धूपगढ हे पचमढीचे सगळ्यात उंच असलेलं ठिकाण ,इथला सूर्यास्त बघायला बहुतेक पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. उंच,वेडीवाकडी वळण घेत वेगवेगळ्या डोंगरांना वळसा घालत अरुंद अश्या कठीण रस्त्यानी इथे जिप्सीने पोहचता येते .रस्त्यात खोल दिसण्याऱ्या दऱ्या ,ते बघायला केलेली खास व्यवस्था ,वेगवेगळे "इको"पॉइंट आदी अनुभवत अर्थात गाडीतून खाली उतरायची परवानगी नसल्याने उघड्या जिप्सीतूनच या सगळ्या गोष्टींचा आनंद घेत धूपगडला पोहचतो. इथून पण काही ठिकाणांवरून खोल दरीचे विहंगम दृश्य ,खाली सापासारखे दिसणारे वळणदार रस्ते बघायला खूप मजा येते. एखाद्या छोट्या डोंगरासारखे मोठे मोठे दगड पाहून आश्चर्यही वाटते. तिथून चालत आपण सूर्यास्ताच्या दर्शनाला निघत असताना रस्त्यात एक छान ब्रिटिशकालीन वास्तू व संग्रहालय दिसते,आजूबाजूला विश्रांती व कँटीनची व्यवस्था पण आहे ,तिथून खाली उतरत स्टेडियम सारख्या पायऱ्यांची व्यवस्था पर्यटकांना बसायला व सुर्यास्ताचे अनोखं दृश्य डोळ्यात साठवून ठेवायला केली आहे. इथून सूर्यास्ताची विलोभनीय दृश्ये मनात ,नजरेत साठवून ठेवताना एक वेगळीच अनुभूती मिळते. सूर्याचा लालबुंद गोळा हळू हळू नाहीसा होतानाचे दृश्य आपल्या कॅमेरात बंदिस्त करायला पर्यटकांची लगबग व त्याच्या पार्श्वभूमीवर आपले फोटो काढून घ्यायची "धडपड"बघून चांगलीच करमणूक होत होती.थोडा काळोख झाला कि लहान गावातले,तसेच पिपरीया एव्हढेच काय इटारसीचे लुकलुकणारे दिवे काळ्याकुट्ट अंधारात काजव्यांनी प्रकाशाव असं सुंदर दृश्य दूर नजरेस पडताना दिसते.
ह्या सर्व पर्यटन स्थळांचा मनमुराद आनंद घेत ,पचमढीच अनोखं निसर्ग सौन्दर्य भरभरून डोळ्यात ,मनात साठवत व परत इथे नक्की भेट द्यायचीच असा निग्रह करत परतीच्या वाटेला लागलो आणि पचमढीचा निरोप घेतला. डोंगर माथ्यावरून खाली उतरल्यानंतर दोन्ही बाजूला बाजूला असलेल्या जंगलाच्या मधून जाणाऱ्या रस्त्यांवर, आजूबाजूच्या पाड्यातील अनेक जण टोपलीत खवा विकत असल्याचं बघायला मिळालं .पळसाच्या पानावर एक वाटा ठेवून त्याला व्यवस्थित गुंडाळून ,एक वाटा १०-२० रुपयाला विकणारे ,गाडीला हात दाखवून थांबायचा आग्रह करणारे हे गरीब लोक बघून थोडस वाईट देखील वाटले. जगण्याचा संघर्ष किती वास्तविक असतो ,हे वातानुकूलित गाडीत बसून निसर्गाचा आनंद घेणाऱ्या शहरी लोकांना या "निसर्ग पुत्रांचा"आक्रोश थोडा जरी कानावर गेला तरी इथे येण्याचं सार्थक लाभेल असं वाटते. घरी गेल्यावर खव्याची पोळी,गुलाबजाम करायचेच हा,व त्यांचा विक्रीचा आनंद अबाधित ठेवण्यासाठी गरज नसताना थोडी जास्तीची खरेदी केली,तीही कुठलीच घासाघीस न करता!
नेहमीच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडं दूर जात हे तीन दिवस निसर्गाच्या सानिध्यत ,खूपच आंनदाने घालवले. निसर्ग किती मुक्त हस्तांनी उधळण करीत असतो याचे यथार्थ चित्रण पचमढीच्या निमित्ताने आम्हाला झाले. इतकं सुख,समाधान देणारा हा निसर्ग मानवरूपी राक्षसांच्या तावडीतून वाचवणे हि काळाची गरज आहे हे पदोपदी जाणवत होते ,या सत्कार्यात आपणही कुठेतरी आपला खारीचा का होईना पण वाटा उचलला पाहिजे याची जाणीव या पचमढीच्या दर्शनाने मनात जागवली हीच या "ट्रिपची"फलश्रुती मानवी लागेल.
२५-०६-२०२० —मोहरा
'