"झंडू"-बाम नाही एक विशेषण
"झंडू" म्हणटल कि आपल्याला पटकन आठवतो तो "झंडू बाम" आणि म्हणूनच एखाद्या व्यक्तीला नुसतं झंडू म्हणायच्या ऐवजी आपण सहजपणे त्याला " झंडू बाम" असे संबोधन वापरतो. व्यक्ती विशेषाला उपरोधाने,मूर्ख ठरवण्याच्या उद्देशाने वापरलेला हा खास ठेवणीतला शब्द असेच याचे वर्णन करावे लागेल. विशेषतः तरुण वर्गात अतिशय लोकप्रिय झालेला हा झंडू बाम शब्द आपल्या मित्र-मैत्रिणींना एक विशेषण लावायला सहज वापरल्या जातो. ह्याच झंडू बामचे काय इतर कुठल्याही बाटलीचे झाकण "ढक्कन "म्हणून विशेष व अति प्रेमाने तरुण मंडळी आपसात वापरात असतात ,व बाम बरोबर झाकणाला सुद्धा तेवढेच महत्व देण्याचे बहुमोल कार्य करत असतात.
माझ्या सारख्या जिज्ञासू ? माणसाला झंडू हा शब्दाची व्युत्पत्ती कुठून झाली असावी हा प्रश्न नेहमीच पडतो पण त्याबद्दल विशेष माहिती कुठेच मिळाली नाही पण "झंडू" हि आयुर्वेदाचे औषध बनवणारी कंपनी १९१०साली अस्तित्वात आल्याचं कळलं ,गुजरातच्या भावनगर संस्थानातील प्रधानमंत्री पट्टाणी यांनी गुजरातच्याच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षात प्रसिद्ध असलेल्या त्या काळातील सुप्रसिद्ध वैद्य झंडू भट्ट यांच्या सहकार्याने हि कंपनी सुरु केली व त्यांचेच नाव "झंडू फार्मासुटिकल" हे कंपनीला देण्यात आले सध्या आयुर्वेद क्षेत्रात देश- विदेशात दबदबा ठेवणारी हि कंपनी आपल्या सगळ्यांनाच त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आयुर्वेदिक औषधांनी माहिती आहेच .मागच्या दहा वर्षांपूर्वी हि प्रसिद्ध कंपनी चिरपरिचित गोरेपणाची क्रीम बनवणाऱ्या इमामी कंपनीच्या ताब्यात गेली आहे
असो,तर मूळ शब्द "झंडू" म्हणजे इडियट ,मूर्ख बावळट ह्या अर्थाने सर्रास वापरल्या जातो ,पण १०० वर्षांपासून वापरात असलेल्या आयुर्वेदिक बाम झंडू मुळे एखादया व्यक्तीला फक्त "झंडू "न म्हणता झंडू बाम म्हणायची पद्धत रूढ झाली असावी असा कयास आहे . वास्तविक "झंडू"आणि झंडू बाम याचा दुरानव्ये संबंध नाही,पण लहानपणी सतत नाक वाहत असणाऱ्याला आम्ही शेम्बडा या प्रचलित शब्दाने हाक न मारता "डालडा"म्हणायचो असाच काहीतरी बादरायण संबंध आधीपासून प्रसिद्ध असलेल्या बाम मुळे झंडू समोर सहजपणे बाम शब्द जोडल्या गेला असावा पण काहीही असो ,विना पैसे खर्च करता ईतकी सोपी ,स्वस्त जाहिरात मात्र ह्या कंपनीच्या उत्पादनाची आजतागायत बिनभोबाटपणे कॉपीराइटचा कुठलाही अडसर न येता सुरु आहे हे एक वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.
विशेषतःहिंदी बहुल भागात, हिंदी -मराठी एकत्रित बोलणाऱ्यामध्ये ,मोठ्या शहरातून जसे मुंबई,पुणे नागपूर इ. ठिकाणी बोलताना "झंडू" या पदवीने अलंकृत करण्याची सवय बऱ्याच जणांच्या तोंडी आढळते व मित्रमंडळात ,'अरे झंडू आला' ,'झंडू आहे काय बे' अशी वाक्य वारंवार सहजपणे ऐकायला मिळतात .
मुळात झंडू बाम हा "एक बाम सौ काम"ह्या युक्तीने बऱ्याच दुखण्यांवर वापरला जातो म्हणजे "मल्टिपर्पज" या अर्थाने,तसाच "झंडू"हा शब्द सुद्धा अनेक विशेषणांनी युक्त म्हणजे बावळट ,मूर्ख, बेअक्कल ,पागल इ. सर्व शब्दांचे एकत्रित करून काढलेले अचकट -विचकट शब्दरूपी रसायन म्हणजे "झंडू"!
एक मात्रा कमी केली किंवा एका वेलेन्टीने ह्या शब्दाचा झेंडू सहज होतो.गेंदेदार अथवा एकेरी,पिवळा,केशरी रंगाच्या या फुलांचे आंतर्बाह्य स्वरूप मात्र "झंडू"या शब्दाला कुठेच मेळ घालत नाही.पण प्रख्यात साहित्यिक आचार्य प्र. के. अत्रे यांनी केशवकुमार या टोपण नावानी लिहलेला 'झेंडूची फुले' हा सुप्रसिद्ध विडंबन काव्यसंग्रह लिहला जो मराठी साहित्यक्षेत्रात अतिशय नावाजल्या गेला ,तर हा झेंडूची फुले हा विडंबन काव्य संग्रह "झंडू" या शब्दावरून तर आचार्यांना सुचला नसेल ना?,अशी माझ्या 'सुपीक' डोक्यातील 'नापीक' कल्पना सहज डोकावून गेली अर्थात आचार्य अत्र्यांच्या उत्तुंग कार्याबद्दल कुठलाच वाद नाही पण एक बाष्कळ विनोद म्हणूनच ह्याकडे बघावे अशीच अपेक्षा आहे.
एखादी प्रेयसी प्रियकराला "मै झंडू बाम हो गई डार्लिंग तेरे लिये"अशी म्हणू शकते बर का,ईतकी अचाट, अफाट कल्पनाशक्तीचे तारे आमचे हिंदी चित्रपट सृष्टीतील कर्ते-धर्ते सहजरित्या तोडताना दिसतात .'दबंग' या "खानेसुमारीतील" चित्रपटात बिच्चारी बदनाम मुन्नी खास आपल्या स्टाईलने हे गाणे गाताना झंडू बामची जाहिरात मोठ्या प्रमाणात करून जाते ,हे गाणे आणि चित्रपट काही का असेना पण बॉक्स ऑफिसवर भला मोठा गल्ला जमावणारा ठरला ते त्या मुन्नी व तिच्या होणाऱ्या झंडू बाममुळेच हे सत्य नाकारता येत नाही .प्रचलित शब्दांचा चपलखपणे वापर करून गल्ला कसा जमवावा हे कालानुरूप कल्पनेचा व या झंडू बामचा उपयोग इथे महत्वाचा ठरलेला दिसतो. थोडक्यात काय तर झंडू बाम ह्या शब्दाची दखल चित्रपट विश्वाला घायला लागली हेही नसे थोडके.
पूर्वी बाम म्हणजे बोटावर घेऊन चोळायचा एक मलम असच समीकरण राहायचे ,पण हल्ली काळाच्या ओघात याचे स्वरूप सुद्धा बदललेले आढळते ,कांडी सारखा असणारा 'रोलर बाम' हे आधुनिकरुप धारण केलेला हा प्रकार किंवा "स्प्रे" सारखा शिंतोडे उडवणारा प्रकार अर्थात "शिंतोडे" हा एका वैशिष्ट्य अर्थानेच मराठीत वापरला जाणारा म्हणून मराठीत सुद्धा आपण "स्प्रे" हाच सुटसुटीत शब्द वापरतो व शिंतोडे ह्या शब्दाला जाणीवपूर्वक टाळतो. हे बदल झंडू बामच्या बाबतीत सहज घडले पण झंडू हा शब्द मात्र बदलला नाही किंवा तो झान्ड्या, झेंडू,झंडी असा काळानुरूप न बदलता "झंडू"च राहिला कारण अतिशय वैशिष्ट्यपूर्ण संबोधन म्हणूनच!
शब्दांची व्यूत्पत्ती कशी झाली याच एक शास्त्र आहे आणि मराठी साहित्यिकांचा तो एक आवडता विषय पण आहे तरी झंडू ह्या शब्दाचं मूळ मात्र काही सापडत नाही,कुणी काही म्हणा,पण अश्या एका शब्दावर त्या दिवशी गाणे बघता बघता सहच सुचलं म्हणून लिहायचं धाडस केलं ,अर्थात माझी हि "झंडूगिरी"कुणालाही पटणार नाही, पचणार नाही पण असे झंडू लोक आपल्या आजूबाजूला सतत वावरत असतात,त्यासाठी आपली नजर शोधक ठेऊन अश्या समस्त झडूंना शोधून काढणे ,हुडकून काढणे व त्यांना झंडूची पदवी मनापासून देणे हि झंडूगिरी असली तरी कोणाला नामनिर्देशित करत ,नकळत आपण तेवढे हुशार ,शहाणे व समोरचा "झंडू"ठरवणे ह्या सारखे दुष्कृत्य जरी असले तरी मानवनिर्मित स्थायी स्वभावानुरूपच आपली वागणूक असणाऱ्या समस्त शहाण्या लोकांना हे झंडूपुराण एका झंडूतर्फे समर्पित !( कारण हे सर्व लिहण म्हणजे हाही एक झंडुच आहे हा विचार तुमच्या मनात नक्कीच आला असणार! )
१२०७२० --मोहरा