Stay home-Stay Safe ---एक चिंतन- स्त्री मुक्ती
लाॅकडाऊन
जगभरात कोरोनाने प्रचंड थैमान घातले आहे. अजूनपावेतो, यावर कुठलीही लस किंवा औषध निघाले नाही केवळ सामाजिक अंतर व सुरक्षित आपआपल्या घरी बसणे हा एकच उपाय! अख्खा जगातील नागरिक आज घरी बसूनच करोनाशी लढा देत आहेत. आम्ही आज महिन्याभरापासून घरातच बसलो आहे म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत आहोत. पण शतकानुशतके 'ती' घरातच बसली आहे तिच्याबद्दल काय? खरंच विचार करता, 10-15 टक्के स्त्रिया त्याही शहरातल्या, शिक्षण,नौकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडतात बाकी सगळ्या नेहमीच चूल-मूल जबाबदारी सांभाळत वर्षानुवर्षे घरीच बसल्या आहेत किंवा त्यांना तसे करण्यास बाध्य केल्या गेले आहे. घराची सर्वस्वी जबाबदारी, कष्ट, विनातक्रार करता अगदी आनंदाने समस्त महिला वर्ग पार पाडत असतात, ह्या लाॅकडाऊन पिरेड मध्ये म्हणून त्यांचे महत्त्व तेवढेच प्रकर्षाने अधोरेखित करावंच लागेल. आम्हाला महिनाभर घरातच (त्यातही पळवाटा, बाहेर फिरण्याच निमित्त काढणारे महाभाग कमी नाहीत) डांबून बसावं लागल तर किती कहर, किती आक्रोश?,मग पिढ्यानुपिढ्या घरातच बसणारया माउलींच काय?त्यांना नसेल कंटाळा येत?त्यांना नसेल उबग येत?त्यांच्या मनाचा कोंडमारा कधी आमच्यापर्यंत पोहचलाच नाही, आज कोरोनामुळे त्याची हलकिशी का होईना पण जाणिव होते आहे हे महत्वाचे. खरच विचार करता स्त्री ही किती सहनशील, सोशिक असते,आज पुरूषांच्या खांद्याला खांदा भिडवून प्रगतीचे टप्पे गाठणारी स्त्री थोड्याफार प्रमाणात दिसते आहे पण बहुसंख्याकाची स्थिती विशेषतः गाव-खेड्यात किंबहुना शहरी भागात सुध्दा काय आहे? जन्म झाल्यापासून थेट मृत्यू येऊन सुटका होईपर्यंत त्या एका अर्थाने लाॅकडाऊनच असतात त्याची कुणाला काही किंमत ना काही खंत! पुरुषरूपी कोरोना या स्त्रीयांना नेहमीच भय-भीती दाखवत असतो,आपल्या पुरुषी अहंकारात तो सतत त्यांना लाॅकडाऊन करत असतो. पुरुष प्रधान संस्कृतीच्या नावाखाली त्यांना मोकळा श्वास सुध्दा घेऊ द्यायचा नाही हे कोणते कर्तेपण- मोठेपण? ह्या मानसिकतेतून आपण आता बाहेर पडायला हवे, त्यांच्या पंखांना बळकटी देऊन स्वतंत्र उडायला त्यांना बाध्य केल पाहिजे. जस,ह्या लाॅकडाऊनच शल्य पचवत आपण महिना कसातरी काढला , तस आयुष्यभर लाॅकडाऊनमध्ये असणार्या स्त्री शक्तीला त्या जीवघेण्या लाॅकडाऊन मधून मुक्ती देणे हाच ह्या लाॅकडाऊन पिरेड आणि कोरोना भयाचा अंत बघण्यास आतुर असलेल्या समस्त पुरूष वर्गाला काळाचा मौलिक सल्ला नक्कीच असेल अशी शुभकामना ह्या निमित्ताने करू या!
***** *****************
पार थकलो,कष्टिता,सोशिता महिन्याभराचा हा लाॅकडाऊन! आयुष्यच आहे झाकोळलेल, त्यांना कधी घेऊ समजून! जन्मापासून सरणापर्यंत दिसेल कधी निसर्ग-पाऊस-ऊन! घर-संसारात गेला जन्म, कधी न घेतल त्यांना समजून-उमजून! भय-भितीने ग्रस्त घरातच बसल्या सारया मारून-मुटकून!
किती भयानक असे शल्य कळता आजची परिस्थिती पाहून ! करूया स्त्री-मुक्तीचा संकल्प आपण सर्व आजपासून ! घेऊ दे भरारी, घेऊ दे श्वास मोकळा मनापासून! हिच होईल, फलश्रृती पुरूषवर्गाची सोसता लाॅकडाऊन!
300420 'मोह-रा'
एकदम खरंय..पण कधीकधी स्त्रीया देखील यालाच प्रारब्ध मानुन आनंदात राहतात..
उत्तर द्याहटवाजसं एखाद्या बैलाला लहानपणापासून खुंटीला बांधलं असता, नंतर केवळ अॅक्शन केली तरी तो खुंटीला बांधलं आहे असंच समजतो. तशीच काहीशी अवस्था आजच्या ब-याचशा स्त्रीयांनी स्वतःची करून घेतली आहे...
खूप सुंदर
उत्तर द्याहटवा