अशीच गंमत म्हणून,चार ओळी लिहिल्या त्याला चारोळी छान लिहिता,म्हणत उगाचच प्रोत्साहन देणे झाले मग कोरोना मुळे सगळीकडे जो शुकशुकाट पसरला त्यावर करा काहीतरी चारोळी, अस कल्याणी वहिनी ने सुचवतात,खरड्ल्या काहीतरी चार ओळी...................
जगभरात पसरलाय करोनाचा सुळसुळाट! अवनी ही स्तबध् झाली बघता विषाणूचा थयथयाट! व्यय-अर्थ चिंता सतवी राजगृही सुटला थरथराट! घरी-दारी सुतक्यासारखी स्थिती पसरली जाहला शुकशुकाट! मानव आहे हा जिंकण्याची उमेद त्यात घनदाट! राज रूपी नेतृत्व लाभले अवघ्या जगतात मोदी सैराट! नका बाळगू मनी भिती ही बेडा पार करणार हा आपला सम्राट!जनहो,बसा घरीच, शोधु नका बाहेर पडण्या उगा पळवाट! आयुष्य एकदाच मिळते नका करू पोरके कोणाचे ललाट! लवकरी येऊ दे आम्हा सगळ्यांच्या आयुषी तोच जुना खळखळाट! आशेचा किरण नजरात दिसू दे उगवू दे उद्याची सुरम्य पहाट! तुम्हा आदेशे चारोळ्यांची केली ओढत काहीतरी थाट-बाट! सांभाळून घ्या...मान्य आहे लावली प्रतिभावंताची पुरती वाट! हळुच काढितो हेमंत हा चारोळ्याच्या गर्दीतून पळवाट....!
200420 ' मोह-रा'
कोरोना-शुकशुकाट

खूपच छान असेच लिहत रहा
उत्तर द्याहटवा