वाचकांचे मनोगत/प्रासंगिक (तरूण भारत नागपूर दि.१७-०५-२०२० )
अंधारातील "चंद्र" -शेखर
कोरोना महामारी संकट संपूर्ण जगात हाहाकार माजवते आहे. सरकार,शासन आपल्या परीने ह्या संकटावर मात करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे .सगळे राज्य सरकारे,केंद्र सरकार ह्या अदभूत विषाणू पासून जनतेला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्नात आहे.
अनेक सामाजिक संस्था, व्यक्ती, दानशूर या कामात सरकारच्या खांद्याला खांदा भिडवून समाजाचे ऋण फेडायचा आपाआपल्यापरीने प्रयत्न करीत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवकसंघा सारखे संघटन जे कि नेहमीच राष्ट्रकार्यात अग्रेसर असते ,आजही कुठलाही गाजावाजा न करता प्रसिद्धीपासून दूर राहात या राष्ट्रकार्यात सिंहाचा वाटा उचलत आहे. पुण्यासारख्या ठिकाणी १०-१२तास पीपीई किट घालून डाँक्टर्स ,नर्सेस या लोकांबरोबर जीवाची पर्वा न करता अन्यनसाधारण मदत करीत आहेत. ज्यांच्या रक्तातच सेवा कार्य भिनल आहे त्यांचं कौतुक तरी कोणत्या शब्दात करावं? एक अतुलनीय राष्ट्रकार्य हि आणि इतर संघटना,संस्था, व्यक्ती करीत असतानाच दुसरीकडे विचित्र व विदारक चित्र बघायला मिळते आहे.
चमकोगिरी अंगातच भिनल्या गेलेली एक विशिष्ट जमात अश्या कठीण प्रसंगीसुद्धा आपला कार्यभाग मतलबीपणे साधून घेत आहे . गरजू व्यक्तींना मदत करत असतानाचे फोटो,त्यांच्याबरोबर मदत केल्याचा दिखावा सोशल मीडियावर जाहीररीत्या सादर करीत आहे. मदत दुसऱ्याची ,पैसा दुसऱ्यांचा पण हे महाभाग स्वतःच्या नावावर बिनधास्त त्याचे श्रेय लाटताना दिसत आहे. सरकारी पैसा ,मदत जणूकाही स्वतःच्या ,पक्षाच्या खिशातून दिल्यासारखे पत्रक काढून ,गरीब गरजूना स्वतःच्या ,नेत्याच्या नावाने घोषणा दयायला लावून अत्यंत अशोभनीय किळसवाणे प्रकार करीत फिरत आहेत ,हे अत्यंत दुरदैवी आहे.
दुसरीकडे ,पण, असे बरेच दानशूर आहेत जे ज्यांच्या-त्यांच्या ऐपतीप्रमाणे किंबहुना जास्तच समाजाबद्दल उत्तरदायित्व निभावण्यात खारीचा का होईना पण सिंहाचा वाटा समजावा असे कार्य करीत असताना या कानाची त्या कानाला खबर सुद्धा लागू देत नाहीत हे विशेष!
हयांचे एक छोटेसे उदाहरण म्हणजे आमच्या वसाहतीतील हनुमान मंदिराचा चौकीदार !मागील दिड महिन्यापासून "मैत्री" परिवाराच्या आवाहनानुसार वसाहतीतील नागरिक पोळ्या जमा करायचे काम करीत असताना हा नित्यनेमाने आपला वाटा त्यात स्वेच्छेने टाकत असतो. घरात खाणारे पांच तोंड असताना, लाकडाउनमुळे इस्त्रीचा व्यवसाय जवळपास बंदच असताना,कुठलीही आवक फारशी नसताना त्याची हि समाजसेवा लाखभर पैसे वाटणाऱ्या श्रीमंतमाणसापेक्षा नक्कीच काकणभर उजवी वाटते !"गुणवंत" वाटते!
असेच कितीतरी अप्रकाशित तारे या समाजरूपी नभात आपले स्थान टिकवून आहेत असाच एक अप्रकाशित तारा म्हणजे "चंद्र-शेखर"!
मागील महिन्यात समोरच असण्याऱ्या झोपडपट्टीतील गरजू रहिवाश्यांना पाचशे रुपये प्रति व्यक्ती आवश्यक किराणा सामान एकत्र करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यकर्त्याच्या मदतीने व जवळच्याच पोलीस चौकीतील पोलिसांच्या साह्याने त्याचे वाटप कुठलेही गाजावाजा न करता केले हे विशेष!
केंद्र सरकारच्या साधारण श्रेणीत कार्यरत असताना आलेल्या वेतनातील पन्नासहजार रुपये पंतप्रधान निधीला देण्याचे औदार्य त्याने सहजच दाखवत ,त्याविषयी कुठेच वाच्यता केली नाही!
सामाजिक बांधिलकीची सतत जाण ठेवणार हे कुटुंब नेहमीच घरची काम करणारी मोलकरीण, पोळेवाला पंडित ,गाडी पुसणारा, गरीब होतकरू गरजू ह्यांच्यासाठी लग्न,आपरेशन ,शैक्षणिक गरज,इ. कामांसाठी नेहमीच हजारोंची मदत कुठलीही अपेक्षा न ठेवता परत्यावयाची अपेक्षा न ठेवता सतत करत असतात.
मागील दोन महिन्यांपासून अत्यावश्यक सेवा देणारे सोडले तर सगळे सरकारी कर्मचारी घरी बसून वेतन घेत आहेत, पण हे आगळेच व्यक्तिमत्व असण्याराला हे कसे पटेल?आपले पोस्टिंग नागपूरच्या बाहेर असूनही व सद्य परिस्थितीत तेथे जाणे अशक्य असल्याने त्याने प्रशासनाला घरी न बसता नागपुरातच आफिसमध्ये काम द्यायची विनंती केली ,आता रोज दहा ते पांच तो आपली सेवा देतो आहे!,अर्थात बाकी सहकाऱ्यांचा रोष पत्करून!
समाजात अनेक दातृत्वानं आहेत,लाखो,करोडोचे त्यांचे समाजाप्रती अनमोल,बहुमोल योगदानहीआहे पण केवळ ठराविक स्रोतांच्या भरवश्यावर समाजाचे ऋण फेडणारे हा अप्रकाशित चंद्र-शेखर व गुणवंत मला मनापासून भावले. काहीही न करता सतत चुका दाखवणाऱ्या अनेक समाजबांधवांना हे उदाहरण पुरेसे बोलके ठरावे. आपणही समाजाप्रती काहीतरी करू शकतो जे आपल्याजवळ आहे त्यातूनच!न कि मी व माझे कुटुंब एवढाच विचार करता ..... !
अश्या ह्या अप्रकाशित "चंद्राला" माझा मनापासून सलाम! अश्या व्यक्तींचा,त्याच्या कार्याचा ,छोटासा का होईना आदर्श निदान काही प्रमाणात जरी अंगी आचारला तर समाजाचे ऋण काही तरी आपण नक्कीच फेडू शकतो हाच विश्वास या कठीण प्रसंगी आपण बाळगू या व त्याप्रमाणे राष्ट्र कार्यात आपलाही खारीचा वाट उचलू या, हेच या निमित्त्याने सांगणे.
- हेमंत मोहगावकर
९४२३९१३०३०

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा