बंगलोर निवासी श्री रमेश व सौ वर्षा संगमनेरकर यांना नातं झाली,अर्जुन व सुरभी उभयतांना गोड कन्यारत्न प्राप्त झाले त्या निमित्याने त्यांचे अभिनंदन करताना सुचलेल्या काही ओळी--------- अर्थात चि. ताराचे अभिष्टचिंतन!
रूप न्याहाळता वाटे उतरली जणू स्वर्गीचीच अप्सरा !२!
साजरा
गगनी एक "तारा"
गगनातुनी हर्षोल्हासाचा नाद
घुमतसे सारा!
बघा,अवतरली
हि अवनीवरती हो "तारा
"!१!
कोमल कांती
निर्मळ, निष्पाप,चेहरा सदैव
दिसे हासरा!
रूप न्याहाळता वाटे उतरली जणू स्वर्गीचीच अप्सरा !२!
कौतुकाच्या
"वर्षा"वात चिंब
भिजली अवघी हि
धरा ! जीवनी या "दादा"च्या वाहतो
अमृताचा खळ -खळणारा
झरा !३!
दरवळे आसमंती "सुरभी"
बघता गोड आपुल्या
अंकुरा !
लक्ष्य एकच "अर्जुनाचे"रम्य फुलवी
आता छान संसारा!४!
कधी करू
या उधळण आता
या शुभ्र
चांदण्यांची सत्वरा!
आतुरली वाट बघता
असशी दूर
देशी अनुराधा नक्षत्रा!५!
फुलों
असाच सदा संगमनेरकरी
सुरेख हा फुलोरा
!
उधळीत सप्त-रंग
पसरू दे मन्मनीचा
मोरपिसारा!६!
नात्याची गुंफण
करीत सजू दे
सुंदरसा,नाजूकसा गजरा!
उधळीत क्षण भाग्याचे
,सोन्याचे वेचितो हा "मोहरा"!७!
१८०५२०
-मोहरा


वा! खूपच सुंदर वर्णन
उत्तर द्याहटवाहेमंत, खुपच भावना व्यक्त केल्या आहेत. छान👏✊👍
उत्तर द्याहटवा